टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 30 मे 2021 – EPFO ने आपल्या प्रोव्हिडंट फंडच्या खातेधारकांसाठी एक निर्णय घेतला आहे. प्रोव्हिडंट फंड खातेधारकांच्या PF खात्याबाबत 1 जून पासून एक नवीन नियम लागू होणार आहेत.
खातेधारकाने आपले खाते आधार व्हेरिफाइड करणे अनिवार्य केले आहे. खातेदाराने जर असे न केले नाही, तर मोठे नुकसान होऊ शकते. तसेच खात्यात येणारी नियमित रक्कम थांबू शकते. त्यासाठी PF खाते आधारशी लिंक करावे. UAN सुद्धा आधार व्हेरिफाइड करून घ्यावा. असणे गरजेचे आहे.
EPFO ने हा नवा निर्णय सोशल सेक्युरिटी कोड 2020 च्या सेक्शन 142 अंतर्गत घेतला असून कंपन्यांना EPFOने निर्देश दिले आहेत. तसेच पीएफ खाते 1 जूननंतर आधारला लिंक नसल्यास किंवा UAN आधार व्हेरिफाइड नसल्यास त्याचे ECR इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरला जाणार नाही.
अशात खातेधारकांनाचा कंपनीकडून मिळणारा हिस्सा थांबविला जाईल. त्यामुळे प्रोव्हिडंट फंड खातेधारकांनी आपले अकाऊंट नवीन नियमानुसार अपडेट करून घ्याचे.