TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 19 जुलै 2021 – राज्यातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता 11 वीच्या सीईटी परीक्षेची तारखी अखेर आज जाहीर झालीय. 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत ही परीक्षा राज्यात होणार आहे. विद्यार्थ्यांना 20 जुलै (उद्या) सकाळी 11.30 वाजेपासून 26 जुलै 2021 पर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

राज्यामध्ये काही दिवस अगोदर इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता ११ वी ची सीईटी देणे आवश्यक आहे. या सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयांत त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असतो.

जे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांना हॉल तिकीट ही ऑनलाईन मिळणार आहेत. ही परीक्षा १०० गुणांची असणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

१०० गुणांच्या या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे.

या परीक्षेतल्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश दिला जाणार आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज