TOD Marathi

अभिनेत्री तेजश्री प्रधान ( tejashri pradhan ) छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. महाराष्ट्राच्या घराघरात तिचा चाहता वर्ग आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत तेजश्रीनं साकारलेली जानव्ही असेल किंवा ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत साकारलेली शुभ्रा असेल प्रेक्षकांनी नेहमीच तिच्यावर भरभरून प्रेम केलं आहे.
मागच्या काही दिवासांपासून ती मालिका क्षेत्रापासून लांब आहे. त्यामुळे तेजश्री प्रधानचे चाहते तिला पुन्हा एकादा छोट्या पडद्यावर दमदार भूमिकेत पाहण्यासाठी अतुर आहेत. मात्र एका मुलाखतीत छोट्या पडद्यावरील कमबॅकविषयी तेजश्री प्रधान म्हणाली की, मी मराठी मालिकेत म्हणजेच छोट्या पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यासाठी योग्य स्क्रिप्ट आणि योग्य भूमिकेची वाट पाहत आहे.

मीही टीव्हीवर परत येण्याची वाट पाहत आहे. मला माहिती आहे की, माझे चाहते देखील मला टीव्हीवर पुन्हा पाहण्याची वाट पाहत आहेत. पण मला सध्या सर्वोत्कृष्ट गोष्टींची अपेक्षा आहे. मला आता छोट्या पडद्यावर ऑनस्क्रीन मजबूत, सकारात्मक आणि प्रेरणादायी भूमिका साकारायची आहे, आणि त्याची मी वाट पाहत आहे.