TOD Marathi

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) ‘आर्या’ (Arya) या वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय केल्यानंतर आता ती एका नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. सुष्मिता सेनने तिच्या आगामी वेब सीरिजचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. अभिनेत्रीचा लूक पाहून ती ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट होत असून हे सिनेसृष्टीत पहिल्यांदाच घडणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुष्मिता सेन (Sushmita Sen) आगामी वेब सीरिजमध्ये ट्रान्सजेंडर गौरी सावंतची (Gauri Sawant) भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री गौरी सावंत (Gauri Sawant) हिच्या जीवनाचे चित्रण या वेब सिरीजमधून करणार आहे. गौरी सावंत यांनी केवळ ट्रान्सजेंडर समुदायाच्या बाजूने आवाज उठवला नाही तर त्यांना समाजात आदर आणि सन्मान मिळवून देण्यासाठी खूप काम केले आहे.

गौरी सावंत या सखी चार चौघी ट्रस्टच्या संस्थापक आणि संचालिका आहेत. त्याचबरोबर त्याने दत्तक घेतलेल्या मुलीची आणि त्यांच्या नात्याची कथा या चित्रपटात सांगितली जाणार आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून या नवीन वेब सीरिजचे शूटिंग सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

या वेब सीरिजवर काम सुरू झालं असून या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या खांद्यावर असणार आहे. रवी जाधव (Ravi Jadhav) यांनीही सुश्मिता सेनची इन्स्टाग्राम पोस्ट रिशेअर करत याची माहिती दिली आहे. ही वेब सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. या वेब सीरिजचे एकूण ६ एपिसोड असणार आहेत आणि त्यातून गौरी सावंतच्या आयुष्यातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज