टिओडी मराठी, लंडन, दि. 15 ऑगस्ट 2021 – भारत देश ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या बुरुजावरून मुख्य सोहळा पार पडला. त्याचवेळी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांनी मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलीय. या संदर्भातील बॅनर एका पुलावर झळकलं आहे. भारत देशात अल्पसंख्यांक आणि दलितांविरुद्ध हिंसा होत आहे. याकडे प्रशासन आणि केंद्र सरकार देखील लक्ष देत नाही.
लंडनच्या वेस्टमिन्टर ब्रीजवरुन भारतीय नागरिकांनी नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलीय. स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सेलिब्रेशनचे औचित्य साधूनच अनिवासी भारतीयांनी नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
लंडन इथल्या बॅनरवर Resign Modi असे लिहिलं आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. भारतात अल्पसंख्यांक आणि दलितांविरुद्ध हिंसा होत आहेत, असे बॅनर लावणाऱ्या लोकांनी म्हटलं आहे. भारत देशात सामान्य नागरिकांवर अन्याय होत आहे.
तसेच कोविड काळात अनेकांचे हाल झाले आहेत. काळात केंद्र सरकारने आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर अधिक भर दिला पाहिजे होता. तसेच सध्या कोरोना लसीकरण अधिक वेगाने वाढविणे गरजेचं आहे.
1/ As dawn broke in London today, members of the diaspora and friends of India in the UK dropped a huge banner reading #ResignModi from Westminster Bridge. #indiaIndependenceday #IndependenceDayIndia #IndependenceDay2021 pic.twitter.com/sNfCs3OHRX
— SouthAsia Solidarity (@SAsiaSolidarity) August 15, 2021