मुंबई :प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ याच लाईव्ह कार्यक्रमात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना केके याचा ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो जागेवरच कोसळला.
त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले आहे. केके च्या मृत्यूमुळे बॉलिवूड शोककळा पसरली आहे.
दिल्ली येथे हिंदू मल्याळी परिवारात सी. एस. मेनन आणि कुननाथ कनकवल्ली यांच्या पोटी जन्मलेले कृष्णकुमार कुननाथ यांचे पालनपोषण नवी दिल्लीत झाले. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी केकेंनी 3,500 जिंगल्स गायल्या. ते दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूलचे विद्यार्थी होते. किरोरी माल कॉलेजमध्येही त्यांचे शिक्षण झाले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. 1999 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघासाठी त्यांनी “जोश ऑफ इंडिया” गायले. जे खूप गाजले होते.
गायक कृष्णकुमार कुन्नथ याला केके म्हणून ओळखले जात होते. कोलकात्यामध्ये त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. कॉन्सर्ट सुरू असताना अचानक केके खाली कोसळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.