TOD Marathi

ज्ञानवापी मशीद प्रकरणी महत्त्वाची घडामोड, कोर्ट कमिशनर अजय मिश्रांना हटवले

संबंधित बातम्या

No Post Found

वाराणसी: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावर आज वाराणसी कोर्टात सुनावणी झाली. वाराणसी कोर्टाने कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना सर्वेक्षण समितीमधून हटवले आहे. पक्षपातीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर, इतर दोन कोर्ट कमिशनरांना अहवाल सादर करण्यास आणखी दोन दिवसांची मुदत दिली आहे.

ज्ञानवापीतील भिंत पाडण्यावर उद्या निर्णय होणार आहे. ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी याआधी मंदीर होते असा दावा करत काही हिंदुत्ववादी संघटनांनी कोर्टात मशिद परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती.

आज सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येत आहे. या तीन दिवसांच्या सर्वेक्षणात हजारो फोटो आणि व्हिडिओग्राफ पुरावे म्हणून गोळा करण्यात आले आहेत. आज सर्वोच्च कोर्ट कमिश्नर हे सर्व पुरावे सादर करणार होते मात्र, सहाय्यक आयुक्यांनी सकाळीच अहवाल अद्याप पूर्ण झाला नसून अहवाल पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. यावर आज वाराणसी न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.