TOD Marathi

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), गेली अनेकवर्ष तो सातत्याने मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. मात्र आता त्याने हिंदीत आपले स्थान निर्माण केले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या आगामी हिंदी चित्रपटात तो आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार मंडळी दिसणार आहेत.

एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टी (Rohit Shetty) ओळखले जातात. मागच्या वर्षी आलेल्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता त्यांचा नवा चित्रपट येत आहे ज्याचं नाव आहे ‘सर्कस’.

सिद्धार्थने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटनवरून त्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. “आला रे आला सर्कस आला” असा कॅप्शन त्याने दिला आहे पोस्टरमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार दिसत आहेत. यात रणवीर सिंग (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत दिसत आहे.
या सिनेमात सिद्धार्थची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ‘सर्कस’चा (Cirkus) टीझर प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी सिद्धार्थने अशी पोस्ट केली होती की, सिंबामध्ये संग्राम भालेराव आणि तावडेची जोडी होती, आता सर्कसमध्ये काय असेल? त्याने टीझरसाठी खूप उत्सुक असल्याचे सांगत रणवीरसोबत एक फोटोही शेअर केला होता. सिद्धार्थने याआधी रोहीत शेट्टीसोबत ‘सिंबा’, ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’ आणि ‘गोलमाल रिटर्न’ या सिनेमात काम केले आहे. आता तो ‘सर्कस’मध्ये दिसणार आहे.

या चित्रपटात रणवीर सिंगच्या बरोबरीने पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, वरुण शर्मा, अश्विनी काळसेकर, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव (Pooja Hegde, Jacqueline Fernandez, Varun Sharma, Ashwini Kalsekar, Johnny Lever, Siddharth Jadhav) आदी कलाकार असणार आहेत. हा चित्रपट १९८२ साली आलेल्या ‘अंगूर’ चित्रपटाचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे. अजय देवगण या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले मात्र आता चित्रपट २३ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा तो रणवीरबरोबर धमाल करताना दिसणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज