TOD Marathi

Shraddha Murder Case: “…तर आज माझी मुलगी जिवंत असती, श्रद्धा वालकरच्या वडिलांची पत्रकार परिषद

Shraddha Murder Case :
दिल्लीतील बहुचर्चिच श्रद्धा हत्याकांडाचा तपास सुरू आहे, हा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी धक्कादायक माहितीही समोर येत आहेत. श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) हिचे वडिल विकास वालकर (Shraddha Walkar’s father Vikas Walkar press conference) यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी आपली मतं मांडली आहेत. त्यांनी आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

विकास वालकर म्हणाले, श्रद्धा वालकरची हत्या झाली असून आम्हाला अत्यंत दु:ख आहे. दिल्लीचे गव्हर्नर यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मला मिळाले आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे काम संयुक्तपणे व्यवस्थित चालले असून अगदी सुरूवातीस वसई येथील तुळीज पोलीस स्टेशन व मणिपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, जर तसे झाले नसते तर, आज माझी मुलगी जिवंत असती, किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती, असेही विकास वालकर म्हणाले आहेत.

श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले, मी आज माझी मुलगी श्रद्धा वालकर हिच्या मृत्यू बद्दल मी बोलणार आहे. दिल्ली गव्हर्नर यांनी मला आश्वासन दिले आहे की मला न्याय मिळवून देणार आहे. त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील मी भेट घेतली आहे. (I met Devendra Fadnavis, says Vikas Walkar) किरीट सोमय्या हे माझ्या घरी आले होते, तसेच निलम गोऱ्हे यांचेही आभार विकास वालकर यांनी व्यक्त केले.

आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी, सोबतच आफताबच्या कुटूंबातील सदस्यांची सुद्धा चौकशी केली जावी व त्यांना सुद्धा शिक्षा द्यावी. या कटात जे कोणी सामील असतील त्याचा तपास करून त्यांना शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

 

श्रद्धा वालकरच्या वडिलांची संपूर्ण पत्रकार परिषद तुम्ही येथे पाहू शकता: