TOD Marathi

 

धुळे:

दसरा मेळाव्यासंदर्भात शिंदे गटाने काहीशी नरमाईची (Shivsena Dasara Melava) भूमिका घेतली आहे. शिंदे गट (Shinde Group) शिवसेनेचा दसरा मेळावा हायजक करणार का? अशा चर्चा होत्या. धुळे दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. पण आम्ही एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं आहे, असे सामंत म्हणाले. आम्ही दसरा मेळावा साजरा करणार नसल्याचे त्यांनी सांगितलं.

उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आज धुळे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सामंत यांना दसरा मेळाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, ज्यांनी दसरा मेळाव्याची परवानगी घेतली आहे, तेच दसरा मेळावा साजरा करतील, असं सामंत म्हणाले. शिंदे गट दसरा मेळावा साजरा करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क (Shivaji Park Ground) मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने अर्ज केला आहे. मात्र, मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजते. त्यामुळे परवानगी देणार का आणखी काय यावर आता चर्चा सुरु झाली आहे.