TOD Marathi

सातारा | अजित पवार हे आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही, असं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळात गदारोळ उडवून देणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरुन घुमजाव करत, मी तसं बोललोच नव्हतो, असे सांगितले. त्यासोबतच यापुढील काळात अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे संकेतही शरद पवार यांनी दिले. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी शरद पवार यांना शुक्रवारी सकाळी बारामतीमध्ये केलेल्या त्यांच्या वक्तव्याविषयी विचारण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांच्याकडून ‘अजित पवार आमचे नेते आहेत’ असा उल्लेख झाला होता. मात्र, दुपारी साताऱ्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी हे वक्तव्य सपशेल फेटाळून लावले. मी तसं बोललंच नव्हतो. अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. तुम्हाला आठवत असेल, एक दिवशी दोन व्यक्तींचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला होता.

हेही वाचा “…“शरद पवारांनी टाकलेली गुगली ही…”, शिरसाटांचा ठाकरेंवर हल्लाबोल”

पण त्यानंतर जे काही झालं, ते योग्य नाही, आमच्याकडून चुकीची गोष्ट घडली, पुन्हा अशा रस्त्याने जाणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी म्हणून वेगळा निर्णय घेतला होता. एकदा एखादी भूमिका घेतली असेल आणि करेक्शन केली असेल, तर ती संधी झाली. पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी मागायची नसते आणि मागितली तर ती द्यायची नसते, असे त्यांनी म्हटले.

सध्या आमची भूमिका दुसरी आहे. आमचे नेते असं मी म्हणालो नाही. सुप्रिया अजित पवारांना नेते म्हणाली. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. त्याच्यामुळे बहिण भावांच्या नात्यात बोललेल्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे नेते नाहीत, असेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. शरद पवार यांच्या या वक्त्यामुळे अजित पवार यांना आता राष्ट्रवादीतील परतीचे दोर कायमचे कापले गेले असल्याचे संकेत मिळत आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज