महाराष्ट्रातून फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातम्या (Foxconn Project shifted to Gujrat) आल्या आणि राजकीय वर्तूळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडु लागल्या. शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra State Government) महाविकास आघाडीवर तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi Blamed BJP on Foxconn project) भाजपवर आरोप केले. अनेक नेत्यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar addressed a Press Conference) यांनीदेखील पत्रकार परिषद घेत हा प्रकल्प महाराष्ट्र राज्याबाहेर जाणे हे दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे. प्रकल्पाची जागा, मविआमध्ये असलेले आणि नव्या सरकारमध्येही असलेले मंत्री यांच्यावर देखील त्यांनी भाष्य केले.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
महाराष्ट्रातून फॉक्सकॉन प्रकल्प बाहेर जाणं दुर्दैवी
● ठाकरे सरकारमध्ये शिंदे, सामंत मंत्री होते
● आता प्रकल्पावरून शिंदे, सामंत आरोप करतात
● फॉक्सकॉनच्या” बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाचा आमिष दाखवायला अर्थ नाही, हे तर रडणाऱ्याला पोराला मोठ्या फुग्याचं आमिष दाखवण्यासारखं आहे
● तळेगाव हीच प्रकल्पासाठी योग्य जागा होती
● प्रकल्प परत आणण्यासाठी मोदींनी मदत केली तर स्वागतचं
● गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा येणं अशक्यचं
● सगळी यंत्रणा थंड झाली आहे का? असा प्रश्न मनात येतो
असे मुद्दे शरद पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मांडले.