TOD Marathi

‘तारक मेहता’ कडून वाईट बातमी. तारक मेहता का उल्टा चष्मा या सर्वात लोकप्रिय सिटकॉम शोच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिशा वाकानी, नेहा मेहता, गुरचरण सिंह यांच्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध चेहरा या शोला अलविदा करणार आहे. “तारक मेहता का उल्टा चष्मा” मधील तारक मेहताची भूमिका अभिनेता शैलेश लोढा करतो. परंतु आता तारकच्या भूमिकेत शैलेश लोढा दिसणार नाही. सैलेश लोढा तारक मेहता का उल्टा चष्मा सोडणार आहे.

शैलेश लोढा शूटिंग करत नाहीत!

तारक मेहता शोशी वर्षानुवर्षे जोडलेले शैलेश लोढा यांनी आता शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकप्रिय शोला अलविदा करण्याचे त्याने मनाशी ठरवले आहे. शैलेश लोढा गेल्या 1 महिन्यापासून शोचे शूटिंग करत नाहीयेत. शोमध्ये परतण्याचाही त्याचा कोणताही विचार नाही.

शैलेश निर्मात्यांना का वैतागला आहे?

शैलेश लोढा त्यांच्या करारावर खूश नसल्याचे सूत्रांकडून समजते. शोमध्ये त्यांच्या तारखा चांगल्या प्रकारे वापरल्या जात नाहीत, असे त्यांना वाटते. शैलेश यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा सोडण्याचे दुसरे कारण सांगितले जात आहे की या शोमुळे प्रतिभावान कलाकार इतर संधी शोधू शकत नाहीत. अलीकडच्या काळात शैलेश लोढा यांनी असंख्य ऑफर्स नाकारल्या आहेत. पण आता शैलेशला मिळणारे इतर प्रोजेक्ट्स गमवायचे नाहीत. म्हणून ते हा शो सोडत असल्याचे सांगत आहेत.