TOD Marathi

पुणे:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या (Savitribai Phule Pragati Panel) मुख्य निवडणूक कचेरीचं उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते तर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या (Savitribai Phule Pragati Panel) माध्यमातून निवडणूक लढवत असून सर्व दहा ते दहा ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तरुण युवक व उच्च विद्याविभूषित उमेदवारांना संधी देण्यात आली असून पॅनलच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन देखील उपस्थितांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, पुणे विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही राज्याच्या शैक्षणिकदृष्ट्या एक महत्त्वाची निवडणूक मानली जाते. पुणे विद्यापीठाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा व समाजातील सर्वसामान्य बहुजन वर्गातील मुला-मुलींना तेथे उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे हीच सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलची माफक अपेक्षा आहे. विद्यापीठाच्या संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणे, विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या प्रमुख मुद्द्यांसह सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचे उमेदवार ही निवडणूक लढवित असून या पॅनलमधील सर्व उमेदवार हे उच्चविद्याविभूषित असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत, त्यांना सिनेटमध्ये ते मांडण्याची संधी नक्की द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड , कमलनानी ढोले पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते (Prashant Jagtap, Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) city chief Sanjay More, Gajanan Tharkude, Sunil Tingre, Chetan Tupe, Jaydevrao Gaikwad, Kamalnani Dhole Patil, Ankush Kakade).