शिवसेनेत आत्तापर्यंतचं काही मोठे बंड झालेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी हे बंड पुकारलं असून शिवसेनेचे काही सोडले तर सर्व मंत्री बंडात सामील झाले आहेत. आता फक्त आदित्य ठाकरेच बाकी राहिले आहेत. अशातच संजय राऊतांनी ट्वीट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Sanjay Raut Shivsena MLA Gulabrao Patil)
बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा.
डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका.
आपण यांना ओळखता ना?
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/8yb33kHFOc— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
ट्वीटमध्ये संजय राऊतांनी (Sanjay Raut) मंत्री गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडीओ शेअऱ केला आहे. शिवसेनेत पुंगाणी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दीपकराव भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणारा गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय, अरे हे सोडा, सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. असं या शिवसेनेचं आहे. रतनिया कहीं साप बदल लेते है, पुण्य की आड मे पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग बाप बदल लेते हैं!, असं गुलाबराव पाटील यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना संजय राऊतांनी म्हटलं आहे की, “बाप बदलण्याची भाषा कोण करतंय पहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर, झाडी, निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र!
दरम्यान, संजय राऊतांनी सामनातून एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवरही जहरी टीका केली आहे. बंडखोर आमदारांचा उल्लेख त्यांनी ‘नाच्या’ असा केला आहे. तसंच केंद्र सरकारने या आमदारांना दिलेल्या सुरक्षेवरुन केंद्रावरही टीका केली आहे.