TOD Marathi

मुंबई: 

सध्या राज्यात एक अत्यंत हतबल आणि कमजोर सरकार आहे. त्यामुळेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगण्यास धजावले, (Karnataka CM on villages in Maharashtra Sangli district) असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. (Sanjay Raut on Karnataka CM statement) राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र हा नीट समजलेलाच नाही. ते अनेक वर्षे संबंधित खात्याचे मंत्री होते. तरी त्यांनी आजपर्यंत सीमावासियांच्या कोणत्या प्रश्नांना वाच फोडली, याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka border issue) सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करु, असे सांगितले. त्यानंतर लगेचच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितला. सीमाभागातील गावे महाराष्ट्रात पुन्हा समाविष्ट करण्याचे सोडाच पण आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही वेस ओलांडून सांगलीतील गावांवर दावा सांगितला आहे. याचा अर्थ इतकाच की, कर्नाटकमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्त्वाखालील मिंधे सरकार आहे. यापैकी कोणाला मुंबई तोडायची आहे. कोणाला महाराष्ट्रातील जिल्हे आणि गावं तोडायची आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरु आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. (Sanjay Raut Criticized Maharashtra govt)

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा सांगत असताना एकनाथ शिंदे आपल्या ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तिकडून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा सांगितला नाही, म्हणजे मिळवले. शिंदे-फडणवीस सरकार दुबळे असल्यामुळे आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करू शकतो, असे अनेकांना वाटू लागले आहे. छत्रपती शिवरायांच्या अपमान होऊनही मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) राज्यपालांचे समर्थन करतात. त्यामुळे हे सरकार घालवलं नाही तर केंद्र सरकारचे हस्तक या महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्यावाचून राहणार नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आम्ही या गावांना पाणी देऊन मदत केली आहे. या ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. कर्नाटक सरकार या ठरावाचा गांभीर्याने विचार करत आहे, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकची महाराष्ट्रातील भूभागावर वक्रदृष्टी असल्याची चर्चा रंगली आहे.