पुणे:
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर (Movies on Chhatrapati Shivaji Maharaj) आधारित विविध चित्रपट येत आहेत. हर हर महादेव चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे तर वेडात वीर मराठे दौडले सात या चित्रपटाच्या मुहूर्ताचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय. मात्र हर हर महादेव चित्रपटातील दृश्यांवर आणि आशयावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati Press Conference in Pune) यांनी आक्षेप घेतलाय. तर वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील मावळ्यांच्या वेशभूषेवरही त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही खपवून घेणार नाही. शिवरायांचा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणू नये. इतिहासाचा गाभा सोडून काहीही दाखवू नका, इतिहासाचा विपर्यास करु नका. कलाकार मंडळींनी हे गांभीर्याने घ्या. असे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. परत सांगितलं नाही म्हणाल… असा दमच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. यावेळी ‘हर हर महादेव’ चित्रपटावर (Sambhajiraje Chhatrapati on Movies Har Har Mahadev and Vedat Marathe Veer Daudle Sat) संभाजीराजेंनी सडकून टीका केली. त्याचवेळी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Sat) या चित्रपटावर देखील संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली.
शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्याविषयी चित्रपट बनविताना जरा भान बाळगण्याची आवश्यकता आहे. चित्रपट काढताना इतिहासाचा अभ्यास हवा. सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी एक समिती असावी. मी याचा पाठपुरावा करणार आहे. इतिहासाचा गाभा सोडून काहीही दाखवू नका, इतिहासाचा विपर्यास करु नका. ज्या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झालाय ते चित्रपट लोकांनी अजिबात पाहू नका, असं आवाहन करतानाच असे चित्रपट कराल तर गाठ माझ्याशी आहे, असं दमच संभाजीराजेंनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना दिला.
संभाजीराजे काय म्हणाले?
-हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड
-वेडात वीर मराठे दौडले सात चित्रपटांवर संभाजीराजेंची टीका
-सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी
-असे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे
-इतिहासाचा गाभा सोडून काहीही दाखवू नका, इतिहासाचा विपर्यास करु नका
-लोकांनी असे चित्रपट अजिबात पाहू नका
-आधीच्या काळातले चित्रपट बघण्यासारखे होते, भालजी पेंढारकर, जयसिंगराव पवार इ. यांनी अभ्यासासाठी आयुष्य खर्ची घातलं
-शिवरायांचा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणू नये
-चित्रपटांतील पेहरावावरुन ते मावळे वाटत नाही
-सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही खपवून घेणार नाही