पुणे : कोरोना लॉकडाऊन काळात सामान्य जनता घरामध्ये कोंडून असताना, जंगी पार्टी आयोजित करणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सध्या अडचणीत सापडले आहेत. यामुळेच त्यांच्या खुर्चीलाही धोका निर्माण झाला आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला असताना त्यांच्या जागी भारताचे जावई आणि मूळ भारतीय वंशांचे ऋषी सुनक यांची निवड होऊ शकते. तसं झालं तर, ती ऐतिहासिक घटना ठरेल. कारण ज्या इंग्रजांनी भारतावर २०० वर्षे राज्य केलं, त्या देशाचं पंतप्रधानपद भूषवून भारतीय वंशांचे ऋषी सुनक ब्रिटनचे सत्ताधीश होतील.
ब्रिटिश मीडियाच्या म्हणण्यानुसार, बोरिस जॉन्सन यांना पद सोडावं लागलं तर त्यांच्याऐवजी ऋषी सुनक यांना पंतप्रधान पदाची संधी मिळू शकते.
ऋषी सुनक सध्या ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे ते जावई आहेत.
ऋषी सुनक यांच्याविषयी…
१९८० साली ऋषी सुनक यांनी विंचेस्टर कॉलेजमधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, राजकारणाचाही त्यांनी अभ्यास केला आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए पूर्ण केल आहे.
राजकारणात येण्यापूर्वी गुंतवणूक बँक ‘गोल्डमन सॅक्स’ आणि ‘हेज फंड’मध्येही त्यांनी काम केल आहे. त्यांनी स्वत: एका गुंतवणूक कंपनीची स्थापना केली. १० कोटी पाऊंडच्या एका जागतिक गुंतवणूक कंपनीची आणि एका लहानशा ब्रिटिश व्यवसायाचीही स्थापनाही त्यांनी केली होती.
ऋषी सुनक यांचे वडील डॉक्टर होते आणि आई केमिस्ट दुकान चालवत होत्या. ते 1960 मध्ये पंजाबहून लंडनला स्थायिक झाले होते.
जॉन्सनचे मुख्य खाजगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांनी अनेक लोकांना पार्टीसाठी मेल केल्याचं समोर आल आहे. मात्र, त्यावेळी देशात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली होती. हे प्रकरणा सध्या जगभर ‘पार्टीगेट’ म्हणून ओळखलं जात आहे आणि जॉन्सनच्या सुमारे अडीच वर्षांच्या सत्तेतील हे सर्वात मोठे संकट म्हणून समोर आल आहे.