राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
गेली 2 वर्षे कोरोना काळात राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात कोणतीही पोलीस भरती झालेली नाही. राज्यभरात अनेक तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून पोलीस भरती होईल याकडे त्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर महाविकास आघाडीने कोरोनानंतर ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.