टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 जुलै 2021 – बिगर-बँकिंग वित्त संस्थांना कर्ज देणे आणि मोठ्या कर्जांचा डाटा ठेवणे यासंबंधीच्या नियमांचा भंग केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आयआरबीने १४ बँकांना दंड ठोठावला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. एका उद्योग समूहाला दिलेल्या कर्जाच्या खात्याची छाननी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या.
यावरून ही कारवाई केली आहे. या उद्योग समूहाचे नाव जाहीर केलेले नाही. तथापि, दंड ठोठावलेल्या बँकांची नावे जाहीर केली आहेत.
यात बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुसी, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करुर वैश्य बँक, पंजाब ॲण्ड सिंध बँक, साऊथ इंडिया बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू व काश्मीर बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे.