TOD Marathi

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागारपदी रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती; इटलीत डिसलेंच्या नावाने Scholarship

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, सोलापूर, दि. 3 जून 2021 – ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. ही नेमणूक जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता केली आहे. जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बँकेच्या वतीने ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेत आहे.

याअंतर्गत जगातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीत वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवलेली आहेत.

जगातील 12 व्यक्तींची ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सल्लागार म्हणून निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे रणजितसिंह डिसले यांनी सांगितले आहे.

इटलीत डिसलेंच्या नावाने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप :
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक म्हणून रणजितसिंह डिसले यांच्या आणि भारत देशाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे, अशी माहिती नुकतीच समोर आली आहे.

इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप या नावाने 400 युरोंची ही शिष्यवृत्ती देणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. या मुलांची निवड बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी करणार असून पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही शिष्यवृत्ती देणार आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज