राज्यात काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गट (Eknath Shinde and Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्याबद्दल (Dasara Melava) मोठ्या चर्चा सुरू असताना बुधवारी दोन्ही मेळावे मुंबईत पार पडले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेप्रमाणे यावर्षीही शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर (Shivaji Park) शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला तर बीकेसी मैदानात (BKC Ground) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दसरा मेळावा झाला.
दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणातून एकमेकांवर जोरदार टीका केली. मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. “भाषणासाठी कोणाला कोणावरचा ‘राग’ लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो. राजसाहेब ते राजसाहेबच” असं टि्वट करीत आमदार राजू पाटील यांनी शिंदेंवर टीका केली. त्यासोबतच “बीकेसीमध्ये तर केबीसी होता, मजा नही आया, असा हॅशटॅग वापरून मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी टीका केली.
भाषणासाठी कोणाला कोणावरचा ‘राग’ लागतो,
अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो.
राजसाहेब ते राजसाहेबच !#मजा_नाय_राव #BKC_तर_KBC_होता#खोके#MNS #दसरा_मेळावा #शिवतीर्थ #BKC pic.twitter.com/jfU8U7IQ4W
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) October 5, 2022
शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानात झालेल्या दसरा मेळाव्याबद्दल अनेक राजकीय नेत्यांचे प्रतिक्रिया अपेक्षित होती .महाराष्ट्राचे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया देत ठाकरेंवर जोरदार टीका केली .तर मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी देखील टि्वट करीत दोन्ही गटावर जोरदार टीका केली आहे.