हिट आणि फ्लॉप चित्रपटांचा सिलसिला सुरू आहे. पण राजकुमार हिरानी हे बॉलिवूडमधील एकमेव असे दिग्दर्शक आहेत ज्यांचे चित्रपट आजपर्यंत फ्लॉप झाले नाहीत. वास्तविक हिराणी यांनी आतापर्यंत फक्त 5 चित्रपट केले आहेत आणि त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे.सिने-निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक राजकुमार हिरानी ( Rajkumar Hirani ) यांचा आज साठावा वाढदिवस आहे.
बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि चतुरस्त्र दिग्दर्शक अशी राजकुमार हिरानी यांची ओळख आहे.त्यांनी केलेल्या चित्रपटांची संख्या कमी असली तरी कथा अशी असते की प्रेक्षकांना त्यांचा प्रत्येक चित्रपट आवडतो.राजकुमार हिरानी हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
राजकुमार हिरानी यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर 11 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
20 नोव्हेंबर 1962 रोजी नागपुरातील सिंधी कुटुंबात जन्मलेल्या राजकुमारी हिरानी यांना राजू हिरानी असेही म्हटले जाते.
राजकुमारी हिरानी यांचा सिनेसृष्टीतील प्रवास खऱ्या अर्थाने 2003 साली सुरू झाला.मुन्नाभाई एमबीबीएस’ ( Munna Bhai M.B.B.S ) हा दिग्दर्शक म्हणून राजकुमार हिरानी यांचा पहिला सिनेमा होता.
पहिला चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा 2003 साली आला होता. राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटातून संजय दत्त आणि अर्शद वारसी यांचा इतका दबदबा होता की ते आजही मुन्नाभाई आणि सर्किट या नावाने ओळखले जातात.2006 मध्ये राजकुमार हिरानी यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाचा सिक्वेल आणला होता. त्यात मुन्नाभाई आणि सर्किटसह ‘महात्मा गांधी’ची तत्त्वे दाखवली. या चित्रपटात संजय दत्तच्या विरुद्ध अभिनेत्री विद्या बालनही दिसली होती.
आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांचा ‘3 इडियट्स’ ( 3 Idiots) हा चित्रपटही राजकुमार हिरानीनेच दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. ही कथा शिक्षण पद्धतीवर आधारित होती.3 इडियट्स नंतर 2014 मध्ये राजकुमार हिरानी यांनी आमिर खानसोबत ‘पीके’ (PK)हा आणखी एक चित्रपट केला. माणसे धर्मात कशी अडकतात हे दाखवले. आमिरसोबत अनुष्का शर्मा आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही दिसले. आणि हा चित्रपट प्रेक्षकांनाही आवडला आणि सुपरहिट ठरला.या यादीत शेवटचे नाव आहे संजय दत्तचा बायोपिक चित्रपट ‘संजू’ ( Sanju). ज्यामध्ये रणबीर कपूर बाबाच्या भूमिकेत दिसला होता. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटानेही प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करण्याचे काम केले. आणि 2018 मध्ये त्याने सर्वाधिक कमाईचा विक्रम नोंदवला.
मात्र, पाच सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर राजकुमार हिराणीचा पुढचा चित्रपट शाहरुख खानसोबत असणार आहे.राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी यांना ‘चित्रपट दिग्दर्शनाची परिभाषा बदलणारे’ असं म्हटलं जातं. ‘डंकी’ या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जे 2023 मध्ये दिसणार आहे.राजकुमार हिरानी यांची एकूण संपत्ती तेराशे कोटींच्या आसपास आहे.