TOD Marathi

माउंट माऊनगानुई : 

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात (IND vs NZ) भारताच्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जबरदस्त फटकेबाजी करत शतकी खेळी केली आहे. सूर्यकुमारने अवघ्या ५१ चेंडूंत १११ धावा काढल्या. सूर्यकुमारच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा पर्याय निवडला. भारताच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. भारताकडून इशान किशन आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) ही नवी जोडी सलामीसाठी उतरली. परंतु ऋषभला या संधीचा फायदा उठवता आला नाही. ऋषभ १३ चेंडूत केवळ ६ धावा करून बाद झाला तर भारताचा दुसरा सलामीवर इशान किशनने ३१ चेंडूंत ३६ धावांची खेळी केली.

गेल्या काही दिवसांपासून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सूर्यकुमार यादवला आज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली होती. सूर्याने या संधीचं सोनं केलं. अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूंवर कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) दोन धावा घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला.