TOD Marathi

राज्यात शिवसेनेचे दोन गट झालेत. निवडणूक आयोगाने दोन गटांना वेगळे नाव देखील दिले. दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आपण स्वबळावर लढणार आहोत, त्यासाठी तुम्ही कामाला लागा तुम्ही प्रामाणिकपणे काम करा’ तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी असं राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले. (Raj Thackeray talks with MNS party workers and office bearers) मंगळवारी रंगशारदा येथे पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. (MNS Party meeting in Rangsharda Mumbai) यावेळी राज ठाकरे यांनी ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या वादावर फार थेट भाष्य केलं नसलं तरी राज्यातील जनता सध्याच्या राजकारणाला वैतागली आहे. अनेक लोकांनी तर दसरा मेळावेही बघितले नाहीत. याउलट मनसेबाबत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे, याचा फायदा घ्या. दिवाळीत घरोघरी जाऊन प्रचार करा, सकारात्मक आणि प्रामाणिक काम करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी असेल, तसेच सत्ता आल्यावर मी तुम्हालाच पदावर बसवेन, ‘मी कोणतेही पद घेणार नाही” अशी खोचक टिपणी देखील राज ठाकरे यांनी केली. (Raj Thackeray says I wont take any position if we come in power)

राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर मनसे पदाधिकारी जोरदार तयारीला लागणार नसले तर नवलच! सध्याच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे, त्यामुळे मनसे हा एकच चांगला पर्याय आहे. न भूतो न भविष्यती असा विजय आपल्याला मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सध्या राज्यात जे सुरू आहे त्या सत्ता संघर्षावर म्हणजे ठाकरे गट शिंदे गट यांच्या पक्षांची नावं, चिन्ह या संघर्षावर कोणीही बोलू नये. सोशल मीडियावर लिहू नये, योग्य वेळी मी पक्षाची भूमिका सगळ्या गोष्टीवर मांडेल. असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तंबी दिली होती.काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं. त्यानंतर काही मनसे पदाधिकाऱ्यांनीही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या बाबत भाष्य केलं होतं. त्यामुळे मनसे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किंवा मार्गदर्शनानंतर नव्या जोमाने कामाला लागतील हे निश्चित…

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज