नवी दिल्ली:
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना 26 वर्षे जुन्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. (Senior actor of Bollywood Raj Babbar) यासोबत त्यांना 8500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. राज बब्बर यांना लखनऊच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. (Lucknow court) राज बब्बर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील करणार असल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण आजपासून 26 वर्षे जुने म्हणजे 1996 चे आहे. तेव्हा राज बब्बर हे समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. (Raj Babbar was Candidate from Samajvadi Party) 2 मे 1996 रोजी मतदान अधिकारी श्री कृष्ण सिंह राणा यांनी वजीरगंज पोलीस ठाण्यात राज बब्बर आणि इतर अनेक लोकांविरुद्ध तक्रार नोंदवली होती.
तेव्हा राज बब्बर यांनी त्यांच्या समर्थकांसह मतदान केंद्रात घुसून ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याचे म्हटले आहे.
याशिवाय राज बब्बर आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारच्या कामात अडथळा आणल्याचेही सांगितले. या भांडणात अनेक पोलिंग एजंटही जखमी झाले.
या प्रकरणाच्या तपासानंतर 23 मार्च 1996 रोजी राज बब्बर यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. ज्यावर आता न्यायालयाने निर्णय दिला आहे.
राज बब्बर यांनी 80 च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर 1989 मध्ये व्ही.पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली ते जनता दलात सामील झाले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. पुढे ते काँग्रेस पक्षात आले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ही राहिले.