टिओडी मराठी, महाड, दि. 27 जुलै 2021 – महाडच्या तळीये या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली सुमारे 35 घरे दबली. यामुळे 49 जणांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतलं होतं. त्यानंतर 85 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 36 नागरिक बेपत्ता आहेत. तळीयेमध्ये मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं आहे.
मागील आठवड्यापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. २२ जुलैला दुपारी ४ वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावावर डोंगर कोसळून मोठी दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसले आहे.
यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा, त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केलीय. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
मात्र, ८५ जणांचे मृतदेह अजून सापडलेले नाहीत. त्यामुळे बचावकार्य सुरू राहणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले होते. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमामध्ये होते. सायंकाळी चौधरी बचावकार्य सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या होत्या.
त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मृतदेहांची अवहेलना पाहवत नाही, ढिगाऱ्याखालून कोणाचे हात तर कोणाचे पाय सापडत आहेत, त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.