TOD Marathi

आता पोस्टातूनही काढता येणार Passports ; करा Online नोंदणी, ‘अशी’ आहे पद्धत

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 26 जुलै 2021 – आता पासपोर्ट काढणे होणार सोपे आणि सुटसुटीत. करणं, यापुढे पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट कार्यालयात हजार चकरा मारण्याची गरज नाही. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून आता पासपोर्ट काढता येणार आहे.

इंडिया पोस्टकडून एका ट्विटद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये, आता आपण जवळच्या पोस्ट ऑफिस सीएससी काउंटरवर पासपोर्टसाठी नोंदणी आणि अर्ज करू शकता. तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी.

www.Passindindia.gov.in नुसार ‘पासपोर्ट सेवा केंद्रे व पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे ह्या पासपोर्ट कार्यालयांच्या विस्तारित शाखा आहेत. पासपोर्ट देण्याशी संबंधित फ्रंट-एंड सेवा प्रदान करतात. या केंद्रांत टोकन जारी करण्यापासून ते पासपोर्ट देण्यासाठी अर्ज करण्यापर्यंतची प्रक्रिया याचा समावेश आहे.

पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी. यानंतर पासपोर्ट तयार करण्यासाठीचे ऑनलाईन शुल्क आणि फॉर्म जमा करावे. त्यानंतर याची एक तारीख सांगितली जाणार आहे. त्या दिवशी आपल्याला निवडलेल्या कागदपत्रांसह नजीकच्या टपाल कार्यालयामध्ये जावे.

आवश्यक कागदपत्रे :
पासपोर्ट मिळविण्यासाठी जन्माचा दाखला, दहावी-बारावीचे मार्कशीट, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड व नोटरीद्वारे केलेले प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. हे सर्व कागदपत्रे घेऊन नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे.

सर्व कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये नेल्यानंतर त्याची सत्यता तपासली जाणार आहे. कागदपत्रे योग्य आढळल्यास प्रक्रिया केली जाईल. या भेटीदरम्यान अर्जदाराचे फिंगर प्रिंट व डोळ्यातील पडदा स्कॅन केला जातो. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेस 15 दिवस लागतात.