TOD Marathi

राज्यात नवं सरकार आल्यानंतर नवीन गोष्टी सुरू आहेत. यातच आज कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आणि काही महत्त्वाच्या घोषणा देखील केलेल्या आहेत. (CM Ekanath Shinde announced important decisions of state government) राज्यात पेट्रोल आणि डिझेल वरील दर कपात होणार असून यामुळे पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहे. (Petrol and Diesel price will be decreased by 5 Rs and 3 Rs respectively)

यासह सरपंच, नगराध्यक्षपदाची निवडणूक, बूस्टर डोज, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. (CM Ekanath Shinde and DCM Devendra Fadnavis Press Conference)

शिंदे फडणवीस सरकारच्या या आहेत महत्वपूर्ण घोषणा

◆ महाराष्ट्रात पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची करकपात

◆ पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार

◆ 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत मिळणार

◆ नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मिळणार

◆ सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार

◆ आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पुन्हा पेन्शन

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंचपदाची निवडणूक ही पुन्हा एकदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तो निर्णय बदलत आता थेट निवडणुका होणार आहेत. अशा पद्धतीने काही महत्त्वाचे निर्णय नव्या सरकारने घेतलेले आहेत.