टिओडी मराठी, दि. 3 जून 2021 – भारत जसा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात आहे. त्याप्रमाणे चीन देखील तरुणांचा देश बनू पाहत आहे. सध्या चीनमध्ये घटली तरुणांची संख्या घटली आहे. त्यामुळे चीनमध्ये आता 3 मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली आहे.
चिनी सरकारने अवाजवी कुटुंब नियोजनामुळे चीन देशात युवा नागरिकांची संख्या घटल्याचा धसका घेतलाय. सध्या चीन हा म्हाताऱ्यांचा देश म्हणून गणला जाऊ नये, यासाठी आता चीनच्या जिनपिंग सरकारने प्रत्येक दांपत्याला 3 मुले जन्मास घालण्याची परवानगी दिलीय.
लोकसंख्या वाढीस आळा बसून नव्या पिढीची लोकसंख्या घटू लागल्याने हा मोठा निर्णय चिनी सरकारला घ्यावा लागलाय. त्यामुळे चीनने आता ‘टू चाईल्ड’ धोरण रद्द करण्याची घोषणा केलीय. मागील काही वर्षांत चीनमध्ये जन्मदर घटला आहे.
तसेच वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील, या भीतीने चीन सरकारने हा निर्णय घेतलाय, असे समजते.