TOD Marathi

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतं फुटल्याची चर्चा आहे. (MLC Election 2022)

शिवसेनेतील महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे हे राज्यात महत्त्वाचे मंत्री देखील आहेत आणि ठाणे जिल्हा व्यतिरिक्त महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होत कालपासून गुजरातेत आहेत. शिंदे यांच्या नाराजीची काय कारणं आहेत यावर राजकीय वर्तुळात खलबतं होत असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या समोर पर्याय काय असतील यावर देखील चर्चा होत आहे.

१) शिवसेना नेतृत्वाशी चर्चा करून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करणं.

२) मात्र पक्ष नेतृत्वाची चर्चा फिस्कटली तर कदाचित ते बाहेरही पडू शकतील.

३) फुटलेल्या आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा पक्ष स्थापन करू शकतात.

४) शिवसेनेत गट स्थापन करून भाजपला पाठिंबा देऊ शकतात.

५) शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यास त्यांच्या मदतीने भाजप सरकार सत्तेत येऊ शकतं.

असे पर्याय आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहेत.