टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 जून 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रमंच संघटनेने ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राजकीय मंचच्या नेत्यांव्यतिरिक्त विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनीही राष्ट्रमंच अंतर्गत सहभाग घेतला.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, भाकप, आप, राष्ट्रीय परिषद, आरएलडी, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला. भाजप विरोधामध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी खलबतं सुरू आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात मागील दोन दिवसांपासून सुरू होती. ही बैठक संपल्यावर माजिद मेमन यांनी प्रतिक्रिया दिलीय.
माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, शरद पवार यांनी ही बैठक बोलावली नव्हती. ही बैठक यशवंत सिन्हा यांनी बोलवली होती. काँग्रेसला आम्ही वेगळे सोडले, हे चुकीचे आहे.
काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण दिले होते. राजकीयदृष्ट्या कोणताही कार्यक्रम नव्हता, राजकीयदृष्ट्या कोणत्याही निर्णयासाठी बैठक बोलावली नाही.
या नेत्यांची बैठकीला उपस्थिती :
शरद पवार, सुप्रिया सुळे, यशवंत सिन्हा, पवन वर्मा, डी राजा, ओमर उब्दुल्लाह, जस्टिस ए पी शाह, जावेद अख्तर, वकील माजिद मेमन, खासदार वंदना चव्हाण, सुधेंद्र कुलकर्णी, अरूण कुमार, अर्थशास्त्रज्ञ निलोलपाल बासू, माजी खासदार सीपीएम जयंत चौधरी, घनश्याम तिवारी, समाजवादी पार्टी बिनॉय विश्वास, खासदार सुशील गुप्ता, आम आदमी पार्टी के. सी. सिंग आदी.