पुणे:
राष्ट्रवादी कांग्रेसच्या वतीने पुण्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. (Pune city protest against statement of Governor Bhagatsingh Koshyari and BJP Spokesperson Sudhanshu Trivedi) “राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना यांबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र व महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तीमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत. ही अतिशय गंभीर व संतापजनक बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत आहेत. यातून त्यांच्या पुर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा ते राबवित आहे. किंबहुना ते महाराष्ट्र भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP city president Prashant Jagtap) यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, “राज्यपाल महाराष्ट्राचा वारंवार अपमान करीत आहेत व त्याला भाजप प्रोत्साहन देत आहेत.” भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi BJP) यांनी तर एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपतींनी ओरंगजेबाची पाच वेळा माफी मागीतली होते असे नीच व अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra DCM devendra Fadnavis) यांनी पाठराखण केली. आंदोलनादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.