मुंबईः नट्टू काका अर्थात तारक मेहता का उल्टा चष्मातील अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले. ते अनेक महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्याची दोन ऑपरेशन्सही झाली होती. ते ७७ वर्षांचे होते. मालाडमधील रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
केमोथेरपी उपचारानंतरही घनश्याम नायक यांना पूर्ण विश्वास होता की ते पूर्णपणे बरे होतील आणि शूटिंगमध्ये परततील. या दरम्यान त्यांनी काही भागांचे चित्रीकरणही केले. तब्येत बरी नसताना देखील त्यांना शूटिंगची उत्सुकता असायची. मात्र त्यांना सेटवर येणं तब्येतीमुळे अशक्य होऊ लागले होते.
घनश्याम नायक म्हणायचे, ते एक कलाकार आहेत आणि त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्या कामगिरीदरम्यान त्यांना मृत्यूही यावा. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण गुजराती आणि हिंदी मनोरंजन आणि नाट्य उद्योगातील त्यांचे योगदान प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील.