लोकमत प्रस्तुत महाराष्ट्राची महामुलाखत या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत पहिलाच प्रश्नाला उत्तर देताना सरकार फेसबुक लाईव्हवर तर तयार करता येत नाही. (Nana Patekar interviewed Eknath Shinde and Devendra Fadnavis) मध्ये बराच काळ गेला त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय झाला, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
हे वक्तव्य करताना अर्थातच नाव न घेता उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेकदा जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हवर अनेकदा टीकाही झाली होती. (Governement cant be formed by Facebook live)
नाना पाटेकर यांच्या विविध प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच अंतिम निर्णयावेळी धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं तर याच मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अंतिम निर्णय होईल तेव्हा धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला.