मुंबई : दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याला (Dasara Melava) शिवसैनिकांसह राज्यभरातील अनेक सर्वसामान्य तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थिती लावतात. मात्र, यंदा शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर 5 ऑक्टोंबर रोजी मुंबईत पार पडणाऱ्या दसऱ्या मेळावात शिवसेनेचा ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Eknath Shinde) असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणारे मुंबईचे डबेवाले यंदा कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार याबाबत आता उत्सुकता लागूल राहिली आहे.
गेले अनेक वर्ष महाराष्ट्रासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मुंबईचा डबेवाला आहे. गेले कित्येक वर्ष मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज म्हणून कायमच डबेवाले बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीशी राहिले. त्याचप्रमाने मुंबई डबेवाल्यांच्या पाठीशीदेखील शिवसेना खंबीरपणे पाहायला मिळाली. शिवसेनेतील बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी दरवर्षी नित्यनेमाने डबेवाले पूर्वीपासून शिवाजी पार्कला जात असत. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) निधनानंतर देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विचार ऐकण्यासाठी आवर्जून डबेवाले हजेरी लावत असत. मात्र, शिवसेनेत झालेल्या दोन गटांमुळे यंदा त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय.
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर यावर्षी दोन दसरा मेळावे होत आहेत. त्यामुळे दरवर्षी शिवसेनेच्या मेळाव्याला जाणारा डबेवाले नक्की कोणाच्या मेळाव्याला जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. .
एकीकडे मुंबई डबेवाला अधिकृत संघटनेने आपण दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केल आहे. त्यातच दुसरीकडे मुंबई डबेवाला असोसिएशनच्या सुभाष तळेकर (Subhash Talekar of the association) संघटनेने आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा (Dasara Melava) मेळाव्याला जाणार असे स्पष्ट केले आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जाणाऱ्या मुंबई डबेवाल्यांचा पाठिंबा यंदा शिंदेना (Eknath Shinde) ही नाही आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही नाही. कारण एक भूमिका घेतल्याने आपलं डबेवाल्यांचं नुकसान होईल. या कारणामुळे मुंबईचा डबेवाला यंदा कोणत्याच दसरा मेळाव्याला जाणार नाही, ते मिळावे घरूनच पाहतील. मुंबईचा डबेवाला ना शिंदेंचा, ना ठाकरेंचा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.