TOD Marathi

दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी निलेश राणे आणि भाजपातर्फे मोदी एक्सप्रेस सोडण्यात येते, ती यावर्षीही सोडण्यात येईल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यंदा कोणणात जाणाऱ्यांसाठी बसेस आणि रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कोकणवासीयांची जेवढी सेवा, भाजपा आणि आमच्याकडून होते आहे, तेवढी दुसरे कोणते पक्ष करत असतील, असं वाटत आहे. सध्या कोकणात बस आणि रेल्वे जातात आहे, भविष्यात विमानांचीही सोय आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी (Ganeshotsav Kokan) सोडण्यात येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या तीन हजार गाड्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. कोकणासाठी गुरुवारपासून जादा गाड्या सुरू होत असून या दिवशी २७ गाड्या रवाना केल्या जाणार आहेत, तर २८ ऑगस्टला १ हजार २४१ गाड्या कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून निघणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.