सध्या राज्यातल्या अनेक नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे देखील अयोध्या दौर्यावर जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्या आधीच आमदार रोहित पवारांनी अयोध्या दौरा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे आणि रोहित पवारांनी या दौऱ्याचं अचूक टायमिंग साधल्याचीही चर्चा आहे.
रोहित पवार म्हणालेत की, राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मी इथे आलेलो नाही. मी रोहित पवार म्हणून इथे आलेलो आहे. आणि माझा स्वतःचा असा काही विचार असू शकतो. माझा विचार मला जे सांगतो, की जिथे गेल्यावर मला प्रसन्न वाटतं, मला बरं वाटतं, एक दिशा मिळते, अशा प्रेरणा ठिकाणी मी नेहमी जात असतो. धार्मिक विषय हे व्यक्तिगत असतात, त्याची कोणीही टिमकी वाजवत राजकारण करू नये हे माझं मत आहे असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान रोहित पवारांनी विवीध ठिकाणी भेटीगाठीही दिल्या आहेत. त्या भेटीची माहिती देखील त्यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.