TOD Marathi

आमदार म्हटले की दिवसरात्र धावपळ, मोठी जबाबदारी अन् भेटणारी , बोलणारी असंख्य माणसे त्यांचा आजूबाजूला वावर… त्यातून वेळ काढत काही पर्सनल कामे करावी लागतात अन् इतरवेळी सतत मतदारसंघाचे दौरे अन् अडचणीवर काम करणे सुरू ठेवावे लागते. अशा या सर्व व्यापात कधी कोणता प्रसंग समोर येईल याची शाश्वती नसते. तेव्हा कसब लागत असतो तो आपल्या मनातील संवेदनशीलतेचा अन् तत्परतेचा. आज मी याच तत्पर अन् संवेदनशीलतेची प्रचिती आलेल्या एक आमदार यांची आजची धावपळ अन् किस्सा इथे वाचा.

आमदार बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) आपल्या नियोजित दौऱ्यावर जात होते. सकाळीच घरातून बाहेर पडले ठरलेल्या वेळेत पोहचण्याची त्यांची घाई होती. उदगीर (udgir)  रस्त्याने असताना त्यांना एक भीषण अपघाताची घटना घडलेली दिसून आली. आपली वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन ते खाली उतरले तर एक गंभीर अवस्थेत महिला होती. चेहऱ्याला लागलेले अन् पाय मोडलेला आणि प्रचंड वेदनेचा सामना ती महिला करत होती. आमदार बाबासाहेब पाटील यांनी लगेच त्यांना मदत करत आपल्या गाडीत टाकून उपचाराला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथून त्यांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमाने पुढील उपचारासाठी उदगीर येथील दवाखान्यात भरती केले.

आमदार बाबासाहेब पाटील यांनी वेळेत अपघातग्रस्त महिलेला मदत केल्याने पुढील अनर्थ टळला.. तसेच त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुकसुद्धा केले जात आहे.