म्हाडा परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर

mhada exam date

म्हाडासह, टीईटी, आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक जाहीर केल्यामुळे म्हाडाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. परंतु आता म्हाडा परीक्षेचे वेळापत्रत जाहीर झालं आहे. ७, ८ आणि ९ फेब्रुवारीला या परीक्षा होणार असल्याचं म्हाडाने जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांना याची माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमुळे म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

आता नवीन वेळापत्रकानुसार ७,८, आणि ९ फेब्रुवारीला सकाळी ९ ते ११, दुपारी १२:२० ते २:३० आणि ४ ते ६ अशा वेळेत या तीन दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता विद्याथ्यांना पुन्हा एकदा या परीक्षांसाठी तयारी करावी लागणार आहे.

Please follow and like us: