TOD Marathi

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील देवकीने केलं लेकीचं पहिलं PHOTOSHOOT

संबंधित बातम्या

No Post Found

 

मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे सध्या पहिल्यांदाच आईबाबा बनले आहेत.

 

नुकत्याच आईबाबांच्या यादीत नव्याने समाविष्ट झालेल्या मराठी सेलिब्रेटी कपल्सपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) आणि अभिनेता कैलास वाघमारे. ( Minakshi Rathod & Kailash Waghmare).

 

या जोडप्याने काही दिवसांपूर्वीच एक गोंडस लेकीचं स्वागत केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही गोड न्यूज त्यांच्या चाहत्यांना दिली होती.

 

नुकताच या जोडप्याने आपल्या लेकीचं पहिलं वहिलं फोटोशूट करुन घेतलं आहे.

 

या जोडप्याच्या लेकीचे गोड (cute) फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

मीनाक्षी राठोडने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्या मुलीचे फोटोशूट केलेले फोटो आपण युट्युबवर शेअर केल्याचं सांगितलं आहे.

 

काही दिवसांपूर्वीच कैलास वाघमारेने आपल्या लेकीचा व्हिडीओ शेअर करत आपल्या लेकीसाठी नाव सुचविण्यास सांगितलं होतं.

 

मीनाक्षीने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत देवकी ही भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे कैलास वाघमारेने तान्हाजी: द अनसंग वारिअर, हाफ तिकीट, ड्राय डे अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.