TOD Marathi

असे बनवा विदर्भाचे चमचमीत तर्री पोहे; जाणून घ्या, पोहे बनवायची कृती

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 17 जून 2021 – चमचमीत पोहे खायचे असेल तर, विदर्भात जावे. मसालेदार, चमचमीत आणि तिखट खाण्याची आवड असेल तर विदर्भातील नागपुरी तर्री पोहे एकदा खाऊन बघा. आता हे पोहे कसे करायचे हे जाणून घेऊया,

विदर्भातील नागपुरी तर्री पोहेसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे :
– पोहे तीन वाट्या
– चणे (हरबरे भिजवलेले) एक वाटी
– बारीक ;चिरलेले कांदे दोन
– हिरव्या मिरच्या चार बारीक चिरून
– कोथिंबीर अर्धी वाटी
– बटाटे साल काढून चिरलेला मध्यमआकाराचा
– टोमॅटो बारीक चिरलेला एक
– वऱ्हाडी मसाला दोन चमचे (नसल्यास कांदा लसूण मसाला घ्या)
– लाल तिखट एक चमचा
– धने पावडर एक चमचा
-हळद अर्धा चमचा
– मोहरी-जिरे
– आलं- लसूण पेस्ट
– साखर अर्धा चमचा
– मीठ चवीपुरते
– शेव सजावटीसाठी
– तळलेले शेंगदाणे
– तेल अर्धी वाटी

जाणून घेऊया विदर्भातील नागपुरी तर्री पोहेची कृती :
– चणे पाणी आणि मीठ घालून एक शिट्टी घेऊन उकडून घ्यावे.
– आता कढईत तेल घालून मोहरी, जिरे तड्तडवून घ्यावे. तेल जरा अधिक घ्या.
– त्यात आलं लसूणाची पेस्ट, एक कांदा लाल होईपर्यंत परतावे.
– आत त्यात एक चमचा वऱ्हाडी मसाला, लाल तिखट, हळद, धने पावडर घालावे.
– आता टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवावे.
– आता त्यात चणे घालून परतावे. सर्व मसाला आणि चणे एकजीव झाल्यावर त्यात पाणी घालून तर्रीला उकळी दयावी.
– तर्रीचा रस्सा पातळ ठेवा. ही तर्री तिखट असते.

अशी आहे पोह्यांची कृती :
– पोहे चाळणीत भिजवून घ्यावे.
– कढईत तेल तापवून त्यात मोहरी घालून तडतडवून घ्यावी .
– आता चिरलेल्या मिरचीचे तुकडे टाकावेत.
– उरलेला कांदा व बटाट्याचे तुकडे घालावेत.
– त्याच फोडणीत साखर, मीठ आणि हळद घाला.
– एक सणसणीत वाफ द्या जेणेकरून बटाटे शिजतील.
– पोहे घालून एकजीव करून पुन्हा एक वाफ दयावी.

पोहे असे करा सर्व्ह :
– खोलगट डिशमध्ये पोहे घ्यावे. त्यावर तर्रीचा रस्सा टाकावा.
– सजावटीसाठी वर भरपूर कोथिंबीर, तळलले शेंगदाणे व आवडीनुसार शेव टाकावी.
-आवडत असेल तर त्यावर लिंबू पिळावा.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज