नवी दिल्ली : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न राज्यातील सर्वच आमदारांना पडला आहे. मात्र नव्या शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौर्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष श्रेष्ठींपुढे याबाबत खलबत होण्याची दात शक्यता आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 22 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यात बारा जणांचा शपथविधी होऊ शकतो यात भाजपकडून सात तर शिंदे गटाकडून पाच मंत्र्यांचा शपथ दिली होईल.
दरम्यान शिवसेना नक्की कुणाची यावरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचला आहे. याचा निकाल सध्या लांबणीवर पडलाय. बंडखोरांची आमदारकी जाणार का? याचीही धाकधूक बंडखोरांना आहेच. त्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास नक्की कुणाला संधी भेटणार, हे पाहण महत्वाच ठरणार आहे.