कोल्हापूर : गेल्या चार पाच वर्षांपासून कोल्हापुरात महाडिक गटाची अपयशानं पाठ सोडली नव्हती. अशातच थेट राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajyasabha Election ) विजय संपादन करून धनंजय महाडिक ( Dhananjay mahadik ) यांनी विजयाचा झेंडा रोवल्यानं कोल्हापूर वाससीयांकडून आज त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. महाडिकांच्या स्वागताला हजारोंची गर्दी, गुलालची उधळफेक आणि कार्यकर्त्यांचा भारीभक्कम जल्लोष पाहायला मिळाला. ( mahadik Win Celebration In Kolhapur )
विरोधी पक्षनेते आणि राज्यसभा निवडणुकीचे खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरलेल्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे ( Dr. Anil Bonde) यांना सहजपणे निवडून आणलं. पण ज्या जागेसाठी चुरशीची लढत होणार होती. त्या सहाव्या जागेसाठीही धनंजय महाडीक यांना निवडून आणण्याची अशक्यप्राय गोष्ट फडणवीसांनी पार करून दाखवली.
कालचा मुंबईतील सत्कार समारंभ आटपून आज महाडीक कोल्हापूरला रवाना झाले. त्यांच्या स्वागताला चक्क कोल्हापूरवासीयांनी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. फटाक्यांचा धुमाकूळ, डिजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारे कार्यकर्ते असं जल्लोषपूर्ण वातावरण आज शहरात सगळीकडे पाह्यला मिळात आहे.