टिओडी मराठी, दि. 13 जून 2021 – आपण पदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात हमखास लिंबाचा वापर करतो. हे संत्री आणि मोसंबी प्रमाणे एक साइट्रस फळ आहे. आपण लिंबाचा रस वापरतो व त्याची साल ही फेकून देतो. मात्र, लिंबाच्या रसा इतकीच लिंबाची साल देखील गुणकारी आहेत.
लिंबामध्ये बायोएक्टिव्हचे प्रमाण अधिक असते, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. लिंबाच्या सालीमध्ये फायबर आणि क जीवनसत्त अधिक प्रमाणात असते.
एवढंच नव्हे तर, कॅल्शियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम देखील अधिक प्रमाणात असतात. जीवसत्तव असलेल्या लिंबाच्या सालीचे जाणून घेऊया फायदे.
लिंबाच्या सालीचे फायदे :
१. लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. संशोधनानुसार आपण जर दररोज एक ते दोन ग्रॅम क जीवनसत्त्वाचे सेवन केले तर, व्हायरल ताप आणि सर्दी होण्याची शक्यता ही ८ ट्क्क्यांने कमी होते.
२. अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने हि हा चिवटपण जात नाही. एखादा पदार्थ करपला की भांड्याच्या तळाला डाग राहतात, अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासल्याने चिवटपणा लगेच निघून जातो.
३. कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो, अशावेळी खाली पाण्यासह लिंबाची एक साल ठेवावी, सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही.
४. चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणार काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.
५. फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्यात, फ्रिजेमधी दुर्गंधी लगेच दूर होते.
६. घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात. तिथे लिंबाची साल ठेवावी, मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.
७. लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतात पण, नखांवर एक वेगळीच चमक येते.
८. ढोपर, हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याने काळवंडलेली त्वचा उजळते.