टिओडी मराठी, दि. 12 जून 2021 – भावना व्यक्त करण्यासाठी चॅटिंगसारख्या माध्यमातून वेगवेगळी आयडिया, युक्त्या वापरल्या जात आहेत. यात वापरण्यात येणारे इमोजी खूप फेमस आहेत. या ईमोजी मध्ये भावनेचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. यात खळखळून हसणारा तो इमोजी सोशल मीडियावर हिट होतोय.
स्मार्टफोनमुळे सोशल मीडिया हा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. जगात युजर सर्वाधिक कोणत्या इमोजीचा वापर करतात, याबाबत नुकतेच एक सर्वेक्षण केले होते.
युजरची सर्वाधिक पसंती आनंदाश्रूसह खळखळून हसणाऱ्या इमोजीला असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर हार्ट इमोजी असून हार्ट आईज इमोजी तिसऱया क्रमांकावर आहे.
मिशिगन युनिव्हर्सिटी आणि पिकिंग युनिव्हर्सिटीने 212 देशांच्या 4.27 कोटी मेसेजच्या आधाराकर हे सर्वेक्षण केले.
त्यांच्या रिसर्चनुसार प्रेंचमधील लोक हार्ट इमोजीचा सर्वाधिक वापरतात. अमेरिकन व रशियातील युजरची पहिली पसंती हसणाऱ्या इमोजीला आहे.