लाखनी येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, समर्थ महाविद्यालय, समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, समर्थ प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी लाखनी येथील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. (Har Ghar Tiranga awareness rally on Azaadi Ka Amrit Mahotsav in Lakhani, Bhandara )
विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव बघता उमेद या संघटनेद्वारे ७५ फूट लांबीचा तिरंगा ध्वज तयार केला, हे या रॅलीचे आकर्षण होते. देश भक्ती गीत आणि वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषात अवघी लाखनी दुमदुमली होती. (Vande Mataram, Bharat Mata Ki Jay)
समर्थ नगर ते पोलीस स्टेशन पर्यंत रॅली काढण्यात आली असून जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार लाखनी महेश शितोळे, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे, प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे, गट शिक्षणधिकारी सुभाष बावनकुळे, गायत्री भुसारी, नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी सौरभ बोरकर यासोबतच समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील राष्ट्रीय छात्र सैनिक, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, लाखनी येथील गाईड छात्र आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी हातात तिरंगा ध्वज होऊन उपस्थित होते.