वादग्रस्त अभिनेत्री केतकी (Ketaki Chitale) चितळेला ठाणे न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तिला ॲट्रॉसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२० साली ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर ठाणे न्यायालयाने तिला न्यालयीन कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी युक्तिवाद होऊन केतकीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. आणि तोपर्यंत तिचा मुक्काम ठाणे कारागृहातच राहणार आहे.