राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात घडलेल्या प्रकारामुळे एका महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्या तक्रारीनुसार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि चौकशीसाठी आवश्यक तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित राहणार आणि चौकशीसाठी सहकार्य करणार अशा अटींवर जितेंद्र आव्हाड यांना हे जामीन मंजूर झालं आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह जितेंद्र आव्हाड हजर होते. कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रम स्थळावरून मुख्यमंत्री निघाले, त्यांच्या गाडीच्या पाठोपाठ जितेंद्र आव्हाड निघाले तिथून बाहेर पडत असताना समोरून एक महिला येत असताना त्यांनी संबंधित महिलेला बाजूला केले. यानंतर त्या महिलेने तक्रार दाखल केली आणि त्या महिलेच्या तक्रारीनुसार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच आपल्याच पाहायला मिळालं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांनी त्यांचे भेट घेत त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता.