टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 10 ऑगस्ट 2021 – भारतीय रेल्वे प्रवासी हिताचा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा पुरवणे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही आपली जबाबदारी भारतीय रेल्वे योग्यपणे सांभाळत आहे. प्रवासी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदललेत. यामुळे तुमच्याकडे आता दुसरा पर्याय उपलब्ध होणार आहे.
आपण एखाद्या रेल्वेने प्रवासाला जायचं ठरवलं तर रेल्वेचे आरक्षण करतो. मग, अचानक आपलं नियोजन रद्द झालं तर आपण भरलेली रक्कम ही परत करताना त्यात काही प्रमाणात कपात केली जाते. पण, आता यात रेल्वेने मोठा बदल केलाय.
आता तुम्ही तुमच्या प्रवासाची तारीख बदलू शकता. इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या प्रवासाचे ठिकाण हि बदलू शकता. स्थानिक रेल्वे स्थानकावरील व्यवस्थापकाकडे एक अर्ज करावा. या अर्जाद्वारे रेल्वे सुटायच्या 24 तास अगोदर तुम्हाला हे आरक्षण रद्द करता येणार आहे.
तुम्ही तुमचा प्रवास हा आरक्षित ठिकाणापेक्षा पुढे करू इच्छीत असाल तरी तुम्ही तिथे तसा बदलू शकता. असे केलं असेल तर याची माहिती तुम्हाला तिकीट तपासणीसाला द्यावी लागेल. सुरक्षित आणि आरक्षित प्रवास या विचाराला सोबत घेऊन भारतीय रेल्वे काम करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.